breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अर्थसंकल्पात नवीन विकास कामांचा समावेश, खर्चाच्या तरतुदीत भरमसाठ वाढ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2020-21 या अर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहराच्या अनुषंगाने काही विकासकामांचा समावेश करून त्यासाठी पुरेसी तरतूद करण्याची सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. त्यानुसार सात प्रकारच्या विकास कामांचा आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असून त्यासाठी प्रशासकीय तरतूद वाढवून तात्पुरत्या खर्चीक रक्कमेला स्थायी समितीने मान्यता दिली.

स्थायी समितीची विशेष सभा आज गुरूवारी (दि. 27) विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये आगामी 2020-21 च्या अर्थसंकल्पातील सदस्यांच्या सूचना, हरकती नोंदवून घेण्यात आल्या. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुचविलेल्या विकास कामांचा अर्थसंकल्पात समावेश करून प्रशासकीय तरतुदीसह तात्पुरत्या खर्चीक रक्कमेला सभापती मडिगेरी यांनी मान्यता दिली.

आमदार जगतापांनी सुचविलेली विकासकामे

चिंचवड विधानसभा मतदार संघातील उद्यानात सेव्हन वंडर्स थीम पार्क गार्डन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी अंदाजपत्रकात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात स्पर्धा परीक्षेचा (युपीएससी, एमपीएससी) अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका व डिजिटल लायब्ररी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटींची प्रशासकीय तरतूद केली आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात नॅशनल वॉर मेमोरियलच्या धर्तीवर परमवीर चक्र विजेता पार्क तयार करण्यासाठी 1 कोटींची तरतूद आहे.

शहरात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चिंचवड येथे अद्यावत योगा भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी तरतूद केली आहे. भोसरी मतदार संघात अद्यावत विपश्यना केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. पिंपळे गुरव येथे 7डी थियेटर बांधण्याची सूचना आहे. त्यासाठी 2 कोटींची तरतूद केली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती होण्यासाठी चिल्ड्रेन ट्राफीक पार्क तयार करण्यासाठी 1 कोटीची तरतूद केली आहे. ही कामे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना सूचविली होती. या कामाचा आगामी अर्थसंकल्पात तरतुदीसह समावेश करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button