नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी भाजपतर्फे उद्या सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/downloadfile-6.jpg)
पिंपरी – पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकात पाटील आणि राज्यमंत्री बाळा भेगडे याचा उद्या (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्याचे खासदार झाल्यानंतर पुणे जिल्हाचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, नुकतेच मावळचे आमदार बाळा भेगडे यांची कामगार, पर्यावरण आणि मदत पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून फडणवीस मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. हे दोघेही निवडीनंतर प्रथमच शहरात येत आहे. भाजपच्या मोरवाडी येथील कार्यालयात सकाळी दहा वाजता पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
त्यानंतर दोघे महापालिकेतील पदाधिकारी आणि पक्ष संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. नवनिर्वाचित पालकमंत्र्यांपुढे पक्षातील काही नगरसेवक व निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून खदखद खासगीत किंवा सार्वजनिकरित्या मांडली जाण्याची शक्यता आहे.