breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक सचिन भोसले यांनी त्वरीत पक्षाचा राजीनामा द्यावा

  • शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांची मागणी
  • बडतर्फीसाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पत्र देण्याचा दिला इशारा

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांच्यावर आरोप करणे म्हणजेच शिवसेना पक्षाच्या शिस्तीचा भंग करणे आहे. बेताल आरोप करणारे शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी पक्षाचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.

ई-लनिॕग प्रकल्पाच्या निविदेवरून स्वताची प्रसिध्दी मिळविण्यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर स्टंटबाजीचा आरोप दुस-याच्या सांगण्यावरून नगरसेवक भोसले करत आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे आतिशय प्रामाणिकपणे व सयंमी भुमीका महापालिकेत घेत आसतात. त्यांच्या कामकाजावर शिवसैनिकांचा विश्वास आहे. यांच्यापुढे शिवसेना गटनेते यांच्या विरोधात भुमीका घ्यावयाची आसल्यास शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्वजी ठाकरे यांच्याकडे बडतर्फ करण्याची मागणी करण्याचा इशारा दाखले यांनी दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button