breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या महापाैर होण्याच्या इच्छेवर फिरणार पाणी ?

जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर पदासाठी इच्छुक असलेले भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला देवून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत दिली आहे

रहाटणी-पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मधून ओबीसी राखीव प्रवर्गातून शत्रुघ्न काटे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. परंतू, महापालिका निवडणूकीत काटे यांनी बनावट कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप करत बाळासाहेब काकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन (नं. 556/2017 ) दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली.

यामध्ये उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर 2018 पर्यंत शत्रुघ्न काटे यांच्या जात प्रमाणपत्राची फेर पडताळणी करण्याचे आदेश जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले. तसेच जात पडताळणी दाखल्यासंदर्भात समितीने योग्य कागदपत्रांच्या आधारे तपशीलवार कारणीमिमांसा दिली नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तपशीलवार कारणीमिमांसा करुन निर्णय घेण्याचे आदेश रियाज छागला व ए. एस. ओक यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर बदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक असलेल्या नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी हे महापौर पदासाठी इच्छुक आहेत. परंतू, त्यांनी कुणबी जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढविल्याने जात प्रमाणपत्राबाबत न्यायालयीन दावा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. तसेच आता जात पडताळणी समितीच्या निर्णयावर त्यांचे भवितव्य ठरवणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यात समितीला आपला निर्णय द्यावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button