नगरसेवक तुषार कामठेंकडून आयुक्तांना दुषित पाण्याची बाटली ‘सप्रेम भेट’, आयुक्तांच्या चेह-यावर स्मित हास्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190618-WA0046.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे निलख, विशालनगर भागातील काही सोसायट्यांमध्ये दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संतप्त नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दुषीत पाण्याचा जार भेट देऊन प्रशासकीय कामकाजाचा निषेध केला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराच्या परिणामामुळे आयुक्तांना दुषीत जार भेट देण्यात आला. प्रशासनाला ही जोरदार चपराख मानली जात आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक सागर अंगोळकर उपस्थित होते. पिंपळेनिलख परिसरातील अनुप्रभा सोसायटी, सुधाकलश सोसायटी, आदित्य बंगला अशा विविध परीसरात दुषित पाणीपुरवठा होत आहे. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ दुषित पाणीपुरवठा थांबवावा अशी मागणी करण्यात आली. परिसरात ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन मिक्स झाल्यामुळे दुषित पाणीपुरवठा झाला असेल असा अंदाज असून, ही कामे तत्काळ पूर्ण कऱण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.