breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक: वायसीएमच्या लिफ्टमनकडून कर्मचारी महिलेची छेडछाड; तक्रार दडपण्याचा अधिका-यांचा प्रयत्न

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – देशभरात गाजणा-या “Me Too”चे स्तोम पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत येऊन पोहोचले असतानाच आता पालिका कर्मचारी महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) लिफ्टमनने एका कर्मचारी महिलेची छेड काडल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी संबंधित महिलेने वायसीएमचे उपवैद्यकीय अधिक्षक शंकर जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न अधिका-यांकडून केला जात आहे. काल बुधवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडलेला असताना अद्याप कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा पालिकेच्या कर्मचारी महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वायसीएमच्या चौथ्या मजल्यावरील वैद्यकीय विभागात संबंधित महिला सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कर्मचारी महिला बाहेर जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी तिने लिफ्टमन म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या ओळखीतील कर्मचा-याला लिफ्ट मागितली. दरम्यान, कर्मचा-याने संबंधित महिलेशी वायसीएमच्या आवारातच गैरवर्तन केले. त्याचा जाब विचारला असता पुन्हा महिलेसोबत छेडछाड केली.

त्यानंतर महिलेने या प्रकाराची वाच्यता न करता आज गुरूवारी (दि. 25) उपवैद्यकीय अधिक्षक जाधव यांच्याकडे लेखी तक्रार केली. हा प्रकार समजताच वरिष्ठांकडून ही तक्रार दडपण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या घटनेला 24 तास उलटतात, तरी अद्याप संबंधित लिफ्टमनवर कारवाई करण्यात आलेली नाही. आता पोलिसांत तक्रार करण्यासाठी महिलेवर दबाव वाढत असल्याचे सांगण्यात आले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button