Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई
धक्कादायक! आई आणि तीन मुलांचे मृतदेह एकाच झाडाला…
![Bhiwandi Mother and her three sons are found to be hanged to tree](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Bhiwandi-Mother-and-her-three-sons-are-found-to-be-hanged-to-tree.jpg)
भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच झाडाला चार जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. यात महिला आणि तिच्या तीन मुलांचा मृतदेह या झाडाला लटकलेला आढळला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून महिला आपल्या तीन मुलांपासून बेपत्ता होती. महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. आता थेट त्यांचे मृतदेह आढळल्याने पतीलाही धक्का बसला आहे.
पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान चौघांच्याही मृत्युचे कारण अजून अस्पष्ट आहे. तसेच ही आत्महत्या आहे की, घातपात याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
वाचाः #VIRALVIDEO: जिंदगी ना मिलेगी दुबारा; वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल