दोन बोगस डॉक्टरांना भोसरी पोलिसांनी अटक
![महिला डॉक्टरने ‘कॅन्सर’ झाल्याचे सांगत रुग्णाला घातला दिड कोटीचा ‘गंडा’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/doctors-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे-नाशिक मार्गावर ‘सफलता आयुर्वेदिक’ नावाने दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ.अहमद इम्तियाज शेख (वय 32, मूळ रा. साबीर प्लाझा, अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) आणि डॉ.मोनी मोहन सुधीर सिन्हा (वय 55 रा. भोसरी, मूळ रा.श्रीकृष्णपूर, जीवनताला, दक्षिण चोवीस परगणा, पश्चिम बंगाल) अशी त्या दोघा बोगस आरोपी डॉक्टरांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर मुकेश लॉज आणि क्लासिक मोबाईलजवळ या दोघांनी सफलता आयुर्वेदिक नावाने दवाखाना सुरु केला होता. त्यांनी चुकीची औषधे देऊन पैसे उकळल्याची तक्रार फिर्यादी अभय चंद्रकांत पवार (वय 47, रा.मौर्या अपार्टमेंट, फणसपाडा, बेलापूर, नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीसांकडे केली. त्यावर पोलिसांनी कारवाई केली असता त्या दोघांकडे डॉक्टरकीचे बनावट प्रमाणपत्र आढळून आले.