breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू फाटा येथे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्याची अज्ञाताकडून हत्या

पिंपरी –  भोसरीतील हत्येला चोवीस तास उलटत नाहीत तोपर्यंत देहू फाटा – आळंदी रोडवरील दिघी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या पुतण्याची अज्ञाताकडून हत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) उघडकीस आली.  राजेंद्र दिंगबर खेडकर (वय 30, रा.च-होली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.  

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे सकाळी बाराच्या सुमारास जखमी तरुणाची बाॅडी आढळून आली. मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या शरीरावर जखमांचे वण आढळले  आहेत. अज्ञात इसमांनी खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी वायसीेएम रुग्णालयाकडे पाठवून दिघी पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button