breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

देव संस्थानच्या जमिनी हडप करणा-या भूमाफियावर कारवाई करा

– सामाजिक कार्यकर्ता शंतनू नांदगुडे यांची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवड येथील देव संस्थानच्या महापालिका हद्दीतील वाकड भागात अनेक जमिनी आहेत. इनाम वर्ग 3 जमिनीची देव संस्थानाकडे अद्याप नोंदी नाहीत. त्या जमिनीची देव संस्थानकडे नोंदी करुन त्या जमिनी संस्थानास परत मिळाव्यात,  संस्थानच्या बेकायदेशीर मार्गाने जमिनी हडप करणा-या भूमाफियावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंतनू नांदगुडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. या मागण्याबाबत आज ( बुधवारी) चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमोद शिंदे, सागर देव, गणेश देव, अमोल उबाळे, मनिष वाघमारे, संदीप चव्हाण, भारत मिरपगारे, मारुती जाधव, संगिता शहा आदी उपस्थित होते. 

याबाबत नांदगुडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  चिंचवड येथील देव संस्थानच्या महापालिका हद्दीतील वाकड ता. मुळशी या भागात अनेक जमिनी आहेत. एलिनेशन रेकाॅर्डनूसार देव संस्थानमधील इनाम वर्ग 3 जमिनी आहेत. यातील इनाम वर्ग 2 आणि 6 मधील जमिनी वगळता संपुर्ण गावात एकूण 1640 एकर जमिन इनाम वर्ग 3 च्या आहेत. मात्र, बाॅम्बे ट्रस्ट अॅक्ट 1950 नूसार सर्व इनाम वर्ग 3 जमिनीची नोंद अद्याप चिंचवड देवस्थान ट्रस्ट संस्थानच्या मालमत्तेत नोंद केलेली नाही. याविषयी धर्मदाय आयुक्त पुणे आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्तांना पत्र देवून माहिती दिली.

तसेच इनाम वर्ग 3 जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार व टी.डी.आर. हस्तांतरण होवू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरसचिव प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे 19 मे 2018 दिले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्त पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनाही पत्राद्वारे कळविलेले आहे. परंतू, त्या इनाम वर्ग 3 जमिनीवर ठोस कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे देव संस्थानची जमिनी त्यांना परत मिळाव्यात, बेकायदेशीर मार्गाने जमिन हडप करणा-या भूमाफियांना शिक्षा व्हावी, चिंचवडच्या संस्थानपुढे धरणे आंदोलन करण्यात आले आहे.  याबाबत देव संस्थानकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पंरतू तो होवू शकलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button