breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांगांना प्रमाणपत्राशिवाय ‘पीएमपीएमएल’चा प्रवासी पास मिळणार

पिंपरी / महाईन्यूज

शहरातील दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय ‘पीएमपीएमएल’चा प्रवासी पास मिळत नव्हता. आता या प्रमाणपत्राशिवाय पास देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. पूर्वी प्रमाणपत्राचा निकश बंधनकारक होता. त्यामुळे अनेकांना पास सुविधेचा फायदा घेता येत नव्हता. ही अट आता कायमची दूर करण्यात आल्याने दिव्यांगांना त्याचा फायदा घेता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागर वस्ती विकास योजना विभागातर्फे दिव्यांगांसाठी 21 प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी शहरातील तीन हजार 725 दिव्यांग पात्र ठरले आहेत. आणखी सुमारे दोन हजार दिव्यांग असण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे सर्वच दिव्यांगांना पीएमपीएमएल प्रवासाचा पास देण्यात यावा. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सांगितले.

2020-21 च्या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत 21 उपयोजनांचा लाभ दिव्यांगाना मिळणार आहे. त्यासाठी 27 कोटी 16 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पंडीत दिनदयाल उपाध्याय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी आठ कोटी 50 लाख रुपयांची तरतूद आहे. आजपर्यंत सहा कोटी 90 लाख रुपये खर्च झाले आहेत. या योजनेतून दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये अनुदान दिले जात आहेत. तीन हजार 725 जणांना आतापर्यंत 74 लाख 50 हजारांचे अनुदान वाटप झाले आहे. सध्या एक कोटी 59 लाख पाच हजार 560  रुपये तरतूद शिल्लक आहे. त्यात आणखी तरतूद करणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button