Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दिवंगत मधुकरराव पवळे यांना महापालिकेकडून अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/madhukar-Pawale.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
त्यानंतर निगडी येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयासही उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक
आदी उपस्थित होते.