दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना पालिका प्रशासनाकडून अभिवादन, शपथही केली ग्रहण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/DSC_402.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही यावेळी ग्रहण करण्यात आली.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/DSC_4038-1024x702.jpg)
कोणत्याही प्रकारच्या हिसांचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करुन तसेच संविधानिक मार्गाचा अवलंब करुन, सोडविण्याची प्रतिज्ञा, सदभावना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली. प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले तसेच उपस्थित मान्यवरांना व कर्मचा-यांना सदभावना शपथ दिली.
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.