breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

दापोडी दुर्घटना, ठेकेदार व अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

एका कामगारासह अग्नीशमन जवानाचा मृत्यू, शिवसेनेचे आयुक्तांना दिले पत्र

पिंपरी |महाईन्यूज|

दापोडी – फुगेवाडी उड्डाणपुल येथील आनंदवन वसाहत परिसरात महापालिकेच्या अमृत योजनेतंर्गत जलनिस्सारण वाहिनीचे काम चालू आहे. या कामाकरिता सुमारे 20 ते 25 फूटापर्यंत खोल खड्डा काढण्यात आला होता. त्या खड्ड्यात तीन मजूरासह अग्नीशमनचा एक जवान मातीच्या ढिगा-याखाली गाडला गेला होता. त्यात एक कामगार आणि एक जवानाचा मृत्यू झाला असून त्या ठेकेदारासह संबंधित अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

दापोडी-फुगेवाडी उड्डाणपूला जवळील दुर्घटनेत खोल खड्ड्यात गाडले गेलेले बिगारी मजूर नागेश जमादार यांचा मृतदेह पहाटे 3.30 वाजता बचाव पथकांनी बाहेर काढला. सुमारे दहा तास हे बचाव कार्य सुरु होते. तर महापालिका अग्नीशमन विभागाचे जवान विशाल जाधव यांचा दुदैवी मृत्यू झाला.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/457728528219016/

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिलेल्या माहिती नुसार, या दुर्घटनेत, अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांचे निधन झाले. तर, दलाच्या इतर दोघा जवानांसह दोन जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. या शोध आणि बचाव कार्यात पालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ, बीईजी, पोलीस, मनपा वैद्यकीय व पाणी पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (तहसिलदार), स्वयंसेवी संस्था आणि पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आदी सहभागी झाले होते.

अग्निशमन दलाचे एकूण 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, एनडीआरएफच्या बचाव पथकालाही मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. इतर जवानांनी फायरमन फुंडे, गोगावले यांना बाहेर काढण्यात यश आले. तर विशाल जाधव यांना बाहेर काढल्यावर त्यांना वैद्यकीय उपचासाठी दाखल केले असताना डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

महापालिकेच्या अमृत योजनेतंर्गत जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यात पाटील इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराला काम दिले होते. परंतू, संबंधित ठेकेदाराने सब-ठेकेदार नेमून त्याच्यामार्फत काम सुरु होते. त्याला कोणतेही पुर्व अनुभव व यंत्र सामुग्री नाही. यापुर्वी दापोडीत अंगावर भिंत पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण दडपण्यात आले. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिका-यांवर फाैजदारी स्वरुपाचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button