breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दरोडेखोरांकडून सराफ व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार, एकजण गंभीर
![Two killed in a shooting at a shopping mall in the United States; Four people were injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/1Shoot_1.jpg)
पुणे, (महा-ई-न्यूज) – पुण्यातील येवलेवाडी परिसरातल्या गणेश ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार व्यक्तींनी गोळीबार केला. त्यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात घबराट पसरली आहे.
अमृत परिहार(वय 25) असे गोळीबारात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथे आज बुधवारी (दि. 21) दुपारी पावणेदोनच्या सुमारास गणेश ज्वलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार व्यक्तिंनी दुकानात घुसून गोळीबार केला. दरम्यान दुकानातील नोकराने आरडाओरड केल्यामुळे गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये एकजण जखमी झाल्याची माहिती समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्य सुरू आहे.