breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दत्ता सानेंच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड, हल्लोखोर पसार (VIDEO)

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील जनसंपर्क कार्यालयाची तीन ते चार तरुणांच्या सशस्त्र टोळक्याने आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तोडफोड केली. कार्यालयातील कर्मचारी महिलेला मारहाण करून हल्लोखोर पसार झाले. हा हल्ला कोणी घडवून आणला हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस याचा शोध घेत आहेत.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले वर्ष विरोधी पक्षनेते पद योगेश बहल यांना देण्यात आले. दुस-या वर्षी दत्ता साने यांना हे पद देण्यात आले. पदावर बसल्यानंतर साने यांनी लोकांची कामे करण्याला प्राधान्य दिले. जनहित डोळ्यासमोर ठेवल्यामुळे साने  यांचे पारदर्शक काम अनेकांच्या डोळ्यावर आले. म्हणूनच हा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या महासभेत असो अथवा खुल्या व्यासपीठावर किंवा वैयक्तीक चर्चेत असो, साने आपल्या मुद्यावर ठाम असतात. त्यामुळे त्यांच्याशी सहजासहजी कोणी पंगा घेण्यास धजावत नाही. परंतु, आज तीन ते चार तरुणांच्या टोळक्यांनी त्यांच्या चिखली येथील संपर्क कार्यालयात धुडघूस घातला. टेबलांची तोडफोड केली. त्यांचा फोटोही फोडला. कार्यालयातील एका कर्मचारी महिलेला मारहाण झाल्याचीही माहिती पोलिसांकडून समजते.

  • ही घटना कळताच साने यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी संपर्क साधला. त्यावर तत्काळ पोलिसांनी कार्यालयात येऊन मोडतोडीची पाहणी केली. कार्यालयात आणि परिसरातील दुकानांमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या अधारे गुन्हेगारांचा शोध लागू शकतो. त्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज संकलीत करून तपास करत आह
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button