breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगाव परिवर्तन सोशल फाउंडेशनतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

पिंपरी | प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त थेरगाव परिवर्तन सोशल फाउंडेशनतर्फे अभिवादन करण्यात आले. खिंवसरा पाटील शिक्षण  संकुलामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनिकेत प्रभु,राहूल सरवदे, निलेश पिंगळे, अनिकेत घोडेकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर व शिक्षक उपस्थित होते. अश्विनी बाविस्कर, शिवाजी पोळ, संचिता यांनी गीतामधून डॉ. आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. महाजन यांनी मनोगतामधून डॉ. आंबेडकरांची गुणवैशिष्ट्ये, कार्य उलगडले.

सर्व शिक्षकांनी बुद्धवंदना व भीमस्तुतीमध्ये सहभाग घेतला.

थेरगाव सोशल फाउंडेशनचे बहुतांशी सदस्य हे शाळेचे माजी विद्यार्थी  आहेत. या गोष्टीचा उल्लेख करत निलेश पिंगळे यांनी शाळेतून  असे  सामाजिक संवेदना जपणारे विद्यार्थी घडविल्याबद्दल शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे  विशेष कौतुक केले. फाउंडेशनतर्फे थेरगाव परिसरात कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याविषयी राहूल सरवदे यांनी माहिती दिली. तसेच शाळा व शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांचे या सामाजिक कामात नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे  सांगितले.

येत्या काळात फाउंडेशनच्या वतीने या परिसरात विद्यार्थ्यांसाठी वाचन विकास प्रकल्प राबविणार असल्याची माहिती अनिकेत घोडेकर यांनी दिली. सरला पाटील, वीणा तांबे, मीना जाधव या शिक्षकांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सामाजिक भान असलेल्या या सर्वच माजी विद्यार्थ्यांचा शाळेला सार्थ अभिमान असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सुमंत यांनी केले. तर स्मिता जोशी यांनी  आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button