breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावच्या मनपा शाळेत आगीचा ‘थरार’, विद्यार्थ्यांवर मोठे संकट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळा भरते. सर्वच विद्यार्थी उत्साही वातावरणात शाळेत आलेले असतात. वर्गात विद्यार्थ्यांचे तास सुरू होताच अचानक शाळेत आग लागते. आणि एक व्यक्ती आग.. आग.. आग.. म्हणत विद्यार्थी आणि शिक्षकांना सावध करण्यासाठी अरडाओरड करतो. विद्यार्थ्यांची वर्गाबाहेर पडण्यासाठी एकच धावपळ सुरू होते. प्रचंड सुरक्षितता असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागतेच कशी या विचाराने शिक्षकही हेलावून जातात. ही सगळी धावपळ थांबताच समजते की, ही आग नसून अग्निशामक दलाच्या जवानांचे प्रात्यक्षिक होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाच्या वतीने थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय स्तरावर अग्निशमन व बचावाची प्रात्यक्षिके अग्निशामक विभागाच्या दलाने सादर केली. प्रात्यकक्षिक सादरीकरणाच्‍या कार्यक्रमात सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापनाचे ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहा. पोलिस निरिक्षक, पी. एन. चौगुले, एस. जी. रनवरे, सब ऑफिसर अरविंद गुळींग, सौरभ गिरकर, ए. बी. परब, सुर्यकांत मठपती, फारमन मनोज मोरे, मिलिंद पाटील, भुषण येवले, भाईदास लांडगे, दिलीप गायकवाड, वाहनचालक राजाराम लांडगे, अमोल रांजणे, शुभम काळे आदी उपस्थित होते.

इमारतीला आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेच्या इमारतीबाहेर कशा प्रकारे बाहेर काढले पाहिजे व त्याचबरोबर शिक्षक आणि इतर इमारतीमधील स्टाफ यांनी सुरक्षितपणे इमारतीबाहेर कसे पडावे, याबाबतची माहिती व प्रात्यकक्षिके करुन दाखवण्यात आली. तसेच छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीचे शमन कसे करायचे याचे प्रत्यकक्षिक आग विझविण्याचे नायट्रोजन सिलेंडरद्वारे शाळेतील अध्यापक व अध्यापिका यांचेकडून अग्निशामक विभागाच्या दलाने करुन घेतले.

आपत्ती व्यवस्थापनाचे ओमप्रकाश बहिवाल यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले. तर, आभार प्रभारी प्राचार्य चंद्रशेखर कदम यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button