…’त्या ऑडिओ क्लिप’मध्ये दडलंय काय? महापौरांवर सभा ‘तहकुबीची नामुष्की
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/PCMC-2.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखलीतील संत पीठाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्याचा पुरावा आपल्याकडे असून एक ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी साने यांनी विनंती केली. ‘आपले पितळ उघडे होते की काय’ म्हणून भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी ‘ऑडिओ क्लीप’ ऐकण्यास नकार देत तावातावाने सर्वसाधारण सभा एक तासासाठी तहकूब केली.
संतपीठाच्या कामाच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला आहे. आज सर्वसाधारण सभेत देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात आंदोलन केले. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे आहेत. संबंध सभागृहाला ही ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी साने यांनी ती सादर केली. ऑडिओ क्लिप सादर करताच भाजपच्या पदाधिका-यांना दिवसा आकाशात चांदणे दिसले की काय? त्यांनी ती ऑडिओ क्लिप ऐकण्यास नकार दिला. यावरून महापौर जाधव यांनी संताप व्यक्त करत सर्वसाधारण सभा एक तासासाठी तहकूब केली.
त्यामुळे साने यांच्याकडील ऑडिओ क्लिपमध्ये नेमके दडले तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.