breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

…तर पुन्हा निवडणूका लावून जनतेला जनादेश मागू – खासदार अमर साबळे

पिंपरी |महाईन्यूज|

शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या हट्टापाई हा महाराष्ट्र अस्थिर केला आहे. जनतेने महायुती महाजनादेश देवूनही शिवसेनेने अनादर करुन वेगळी चूल मांडली. सोनिया गांधी आणि शरद पवाराच्या दारात जावून सत्तेसाठी अडून बसली. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, आम्ही पुन्हा जनतेच्या दारात जावून जनादेश मागून सत्तेत येवू – अशी भूमिका भाजप खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक केशव घोळवे, माऊली थोरात उपस्थित होते.

खासदार साबळे म्हणाले की, विधानसभा निवडणुका काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढविल्या, त्याच्यावर टीका केली. त्यात जनतेने महायुतीला काैल दिल्यावर त्याचा अपमान शिवसेनेने केला आहे. काॅंग्रेसने भगवा दहशतवाद म्हणून हिंदुत्ववादी पक्षावर टिका केली. आता त्यांच्याशी सरकार कसे स्थापन करणार, हा खरा प्रश्न आहे.

आमचे संख्याबळ अल्पमतात आहे, आम्ही साधनसुचतेचा सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आम्ही सरकार स्थापन केलेले नाही. याची नोंद जनतेने घेतलेली असून आम्ही पुन्हा जनतेसमोर जावून जनादेश मागणार आहोत. जर काॅंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने सरकार स्थापन न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, त्यानंतर आम्ही जनतेसमोर जावून लोकांना महाजनादेश मागणार आहोत.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला जनतेनेने भरभरुन दिले आहे. जनता सुज्ञ असून त्यांनी दिलेला काैल नाकारणे चुकीचे आहे. त्यातच राज्यावर अवकाळी पाऊसाचे संकट आहे. लोकाचे प्रश्न सुटले पाहिजेत. लोकशाही मार्गाने सरकार विभन्न विचारधारेचे व एकमेकांवर आरोप केलेले सरकार कसे स्थापन होईल. त्यामुळे सरकार स्थापन करायचे असेल, तर लवकर सरकार स्थापन करुन शेतक-यांना न्याय द्यावा. अशी आमची अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button