breaking-newsपिंपरी / चिंचवड
तरुणाच्या मृत्यू प्रकरणी बस चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
पिंपरी – घरी जाण्यासाठी बस स्टाॅपसमोर पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या तरुणाला बसने जोरात धडक दिली. त्यामुळे त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी दीपक खैरनार यांनी केली.
याबाबत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना खैरनार यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले की, रमन मोरे हा तरुण निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील बसडेपो समोर बसची वाट पाहत उभा होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पीएमपीएमएल बसने रमन याला जोरदार धडक दिली. यात रमनचा जागीच मृत्यू झाला. ही बस ‘गिअर’ अथवा ‘हॅंड ब्रेकवर न लावताच उभी केली होती. त्यामुळे यातून चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे रमन मोरे हा तरुण जीवनाला मुकला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.