तरुणाचे अपहरण करून खून
पिंपरी – एका तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवारी (दि. 20) उघडकीस आला आहे. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली असून आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
आदित्य खोत (वय 25, रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने आदित्यला त्याच्या मित्रांनी बोलावून घेतले. पिंपरीतील सुभाषनगर येथे ते सर्वजण जमले होते. आदित्यला नांदेगाव येथे नेण्यात आले. त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. बुधवारपासून आदित्य बेपत्ता होता. त्याबाबत त्याच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. 19) तक्रारही दिली आहे. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला असता मित्रांसोबत असल्याचे त्याने सांगितले होते.