breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्या दोन रुग्णांवर उपचार सुरु

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान आढळलेले सर्वच रुग्ण करोनामुक्‍त झाले आहेत. पहिल्या 12 रुग्णांपैकी 11 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर अजून एका म्हणजेच बाराव्या रुग्णाचा चौदा दिवसांनंतरचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दिल्ली येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्या दोन रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. बारावा रुग्ण फिलिपिन्स देशातून प्रवास करून आला होता. त्याला 19 मार्च रोजी महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे घशातील द्राव तपासणी साठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दुसऱ्या चाचणीसाठी त्याच्या घशातील द्राव एनआयव्ही कडे पाठविण्यात आले आहे. तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 20 मार्च रोजी “करोना’चा शेवटचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर सलग 12 दिवस शहरातही एकही नवीन “करोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे शहर करोनामुक्त होत असल्याने आनंदाचे वातावरण होते. परंतु, दिल्ली येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि. 2) स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात आता केवळ हे दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button