डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनान्निमित्त व्याख्यानाचे आयोजन
![Dr. Organizing lecture on the occasion of Babasaheb Ambedkar Marathwada University Name Extension Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/panther.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनान्निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पिंपरी संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहात गुरुवारी (दि. ११) सकाळी १० ते २ वाजता हे व्याख्यान होणार आहे. ‘पँथर लढा आणि आंबेडकर चळवळ’ या विषयावर पँथर राहुल प्रधान यांचे तर ‘आंबेडकर चळवळीची वाटचाल’ या विषयावर सर्वजित बनसोड यांचे व्याख्यान होणार आहे. आम्ही भारतीय पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील युवक आणि युवती यांना आंबेडकर चळवळ आणि आंबेडकर वाद म्हणजे काय? आणि पँथर लढा आणि आंबेडकरी चळवळ ही युवकांपर्यंत पोहचवली पाहिजे या भावनेने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितले. याचा प्रचार आणि प्रसार करावा तसेच या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.