breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘डेटा एन्ट्री’ कामासाठी केलेली भरती रद्द करा, साद सोशल फाऊंडेशनची मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कोव्हिड १९ करीता मानधन तत्वावर ‘डेटा एन्ट्री’ कामासाठी केलेली भरती बेकायदेशीर असून ती रद्द करण्यात यावी. त्यांच्याजागी चालू वर्षाकरीता मनपामध्ये कोपाचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी साद सोशल फाऊंडेशनचे संघटक राहूल कोल्हटकर यांनी केली आहे.

यासंदर्भात कोल्हटकर यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सहायक मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात प्रशिक्षणार्थींची मुदत संपत आल्यानंतर पदवीधर निवडणूक आचारसंहितेचे कारण देऊन मुदतवाढ दिली नाही. आता आचारसंहिता लागू असताना त्यांना नियुक्ती दिली. नियुक्ती देताना अधिका-यांचा मर्जीनुसार कारभार चालतो. यावरून संबंधित विभागाला शासनाच्या भरती आदेशाचे नियम लागू होत नाहीत का ? असा प्रश्न कोल्हटकर यांनी उपस्थित केला आहे.

कोपा पास प्रशिक्षणार्थी यांना नियुक्त करण्याचे आदेश अथवा नियम असताना जुन्या प्रशिक्षणार्थी यांची भरती करून नव्या उमेदवाराला वा-यावर सोडण्याचे काम संबंधित विभाग करीत आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी याच उमेदवारातील १० उमेदवारांना काढुन टाकण्यात आले. यावरून संबंधित विभागातील अधिकारी यांना आपल्या पसंतीच्या उमेदवारांना संधी द्यायची का ? असा संशय निर्माण होत आहे, तरी ही भरती बेकायदेशीर असून रद्द करावी. या भरतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कोल्हटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button