breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘डान्सबार’मध्ये काम करणा-या तरुणीला पुण्यात आणून केले अत्याचार

पिंपरी |महाईन्यूज|

डान्सबारमध्ये काम करणाऱ्या तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणत चांगली नोकरी लावण्याचे; तसेच लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यातून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. जून २०१९ ते २८ ऑगस्ट २०२० या कालावधीत हिंजवडी येथे हा प्रकार घडला आहे.

शिवा अमरनाथ दुबे (वय २५, रा. नोराटी वस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कळंबोली ठाणे येथील एका डान्सबारमध्ये काम करत होती. तिथे आरोपी दुबे जात होता. डान्सबारमध्ये दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर दुबेने तरुणीला ‘तू डान्सबारमध्ये काम करू नकोस. मी तुला पुण्यातील चांगल्या कंपनीत काम लावतो,’ असे सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून तरुणी दुबेसोबत पुण्यात आली. तरुणीला दुबे याने हिंजवडी येथे एका ठिकाणी भाड्याची खोली घेऊन ठेवले. दुबे तरुणीच्या खोलीवर येऊन तिच्याकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होता. त्यास तरुणीने नकार दिला असता त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.

पुण्यात तरुणीला काम न मिळाल्याने तरुणी पुन्हा मुंबईला राहण्यास गेली. आरोपी दुबे याने तिथे जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तरुणीने मुंबई, गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button