breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठेकेदारांनी कच-यांची लावली वाट; विरोधकांचे हसत-हसत आयुक्तांना घातला घेराव

– विरोधी नगरसेवकांना आरोग्य अधिकारीच माहिती नाहीत
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात कच-यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका आरोग्य विभागाने शहराची विभागणी करुन दोन गब्बर ठेकेदारांना आठ वर्षासाठी कचरा संकलन करुन मोशीच्या डेपोपर्यंत वाहतूकीचे टेंडर दिले आहे. मात्र, तीन दिवसात शहरात जागोजागी कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे विरोधी नगरसेवकांनी आज (बुधवारी) कचरा व्यवस्था बिघडल्याने आयुक्तांना घेराव घालून आंदोलन केले. हे आंदोलन करताना विरोधी नगरसेवकांना आंदोलनाचे गांभिर्य नसल्याचे दिसून आले. त्यांनी आयुक्तांसमोर हसत-हसत आंदोलन केल्याने हे आंदोलन मॅनेज होते का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील घरोघरचा कचरा संकलन करणे, तो कचरा मोशीपर्यंत डेपोत नेवून टाकण्याचे काम दोन ठेकेदारांना देण्यात आले. महापालिकेने मे. भारत विकास ग्रुप इंडिया 21 कोटी 56 लाख आणि ए.जी.एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्टस 22 कोटी 12 लाख रुपयांचे काम या दोघांना काम दिले आहे. दोन्ही ठेकेदारांना 1 जूलैपासून कामास प्रारंभ केला आहे.
शहरात तीन दिवसात कच-याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी पक्षनेत्यांकडे नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच महापालिकेच्या विरोधी नगरसेवकांनी देखील कचरा प्रश्नांवर आंदोलन केले. यावेळी तत्कालीन आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोग्य अधिकारी बदलल्याचे लक्षात येताच मोर्चा आयुक्तांकडे वळवण्यात आला.
शहरातील कचरा व्यवस्थेचे कामकाज तीन दिवसात ढेपाळले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांना आयुक्तांना घेराव घालून निषेध व्यक्त केला. कचरा प्रश्नी आयुक्तांना जाब विचारण्यात आला. संबंधित ठेकेदारांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस द्यावी, दोन दिवसात कच-याचे निराकरण न झाल्यास ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजु मिसाळ, शाम लांढे, मारूती भापकर, युवराज दाखले, साहील शेख, सतिष भवाळ, मनोज लांडगे आंदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button