झाडे दाखवा अन् बजेट घ्या, स्थायीची अधिकाऱ्यांना तंबी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pcmc-building-4.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मागील अनेक वर्षापासून फक्त वृक्षखरेदी आणि लागवड होते. मात्र आतापर्यंत किती झाडे जगली, किती मेली याची भक्कम माहिती उद्यान विभागाकडून मिळालेली नाही. अंदाजे अकडेवारी सांगितली जाते. त्यामुळे उद्यान विभागाने खरी माहिती द्यावी, त्यानंतर स्थायी समिती सदस्य पाहणी दौरा करेल आणि बजेटला मंजुरी दिली जाईल अशी तंबी स्थायी सभापती आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
महापालिकेच्या मधुकर पवळे सभागृहामध्ये मंगळवारी (दि.22) स्थायीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. विषयपत्रिकेवर 2019-20 चे वृक्षप्राधिकरण समितीचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र उद्यान विभागाकडून झाडांच्या बाबतीत माहिती मागवण्यात आली होती. ती माहिती अपूर्ण माहिती मिळालेली आहे. आतापर्यंत दरवर्षी 50 ते 60 हजार वृक्षारोपण केले जाते. महापालिकेकडून फक्त झाडांची खरेदी आणि लागवड ऐवढेच विषय आतापर्यंत होताना दिसून आले आहेत. आतापर्यंत किती झाडे उध्यान विभागाकडून जगवली, किती मेली याची खरी माहिती दिली जात नाही. मोघम माहिती या विभागाकडून प्राप्त झाली आहे. जोपर्यंत खरी आणि भक्कम माहिती मिळणार नाही. तोपर्य़ंत बजेटला मंजुरी नाही अशी तंबी स्थायी समितीकडून अधिकाऱ्यांना देण्यात आली.
उद्यान विभागाकडून पुढील बैठकीत जगवलेल्या, मेलेल्या झाडांची भक्कम माहिती द्यावी अशी मागणी सदस्यांनी केली. माहिती मिळाल्यानंतर स्थायीचे सर्व सदस्य प्रत्यक्ष पाहणीदौरा करतील, त्यानंतर बजेटला मंजूरी दिली जाईल अशा सूचना स्थायी सभापती आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.