breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ज्या सरकारनं आपल्याला वीजेचा ‘शॉक’ दिला, त्याला मतांचा ‘शॉक’ द्या : देवेंद्र फडणवीस

पिंपरी / महाईन्यूज

देशातल्या लोकांना कर्मयोगी मानसं अडतात. बोलघेवडी लोकं अवडत नाहीत. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने कोनाला मदत केली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, महिला अशा कोणाला सुध्दा एका फुटक्या कवडीची मदत केली नाही. गेल्या एक वर्षात सरकारनं कोणतंही आश्वासन पाळलं नाही. वर्षभरात चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र बंद पाडला. एकही नवं काम राज्याला पुढं नेणारं सरकारने केलं नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.

पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारार्थ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा घेण्यात आला. त्यात फडणवीस बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार निरंजन डावखरे, उमेदवार संग्राम देशमुख, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे, उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी महापौर राहूल जाधव, संघटक सरचिटणीस अमोल थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, कोरोना काळात भरमसाठ वीजबिलं नागरिकांना दिली. दोन खोल्यांत राहणा-यांना 30 हजारांचं बिल देण्यात आलं. वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्याची तयारी दाखवली. शेवटी वीज बिल भरावचं लागेल. माफी दिली जाणार नाही, असे सरकारने सांगितले. शंभर पटीपर्यंत वीज बिले वाढीव लावली. चार दिवसांपूर्वी उर्जा मंत्री म्हणतात घोषणा केली होती. पण माझा अभ्यास झाला नव्हता. हे कोणता अभ्यास करतात. हे सरकार रोज घोषणा करतं. कोणतंही आश्वासन पाळत नाही. वर्षभरात चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र बंद पाडला. एकही नवं काम राज्याला पुढं नेणारं सरकारने केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button