जैविक वेस्ट कचरा कुंडीत टाकल्याने संबंधित रुग्णालयावर कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Image-2018-09-20-at-7.34.21-PM-1.jpeg)
पिंपरी – महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यक्षेत्रात आळंदी रोड येथील एका मोठया रुग्णालयाने सिरींजेस आणि निडल्स (जैविक कचरा) असे मोठ्या प्रमाणातील वेस्ट कचरा कुंडीत टाकल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरोग्य निरीक्षक शंकर घाटे यांनी ही कारवाई केली आहे. सहायक आरोग्या अधिकारी प्रभाकर तावरे, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयाकडून तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
जैविक कचरा हा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात इन्सीनरेशनकरीता पाठविण्यात यावा. आपल्या क्लीनिक, दवाखाने, हॉस्पीटल यातील जैविक कचरा रस्त्यावर, कुचराकुंडीत, घंटागाडीत अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास संबंधितांविरुध्द नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे आवाहन वैद्यकीय विभागाद्वारे करण्यात आले आहे.