breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दिल्ली येथील ‘जेएनयू’मधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
तोंडाला काळ्या पट्ट्या लावून युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी कोणतीही घोषणाबाजी न करता मुक आंदोलन स्वरुपात हे आंदोलन करून ‘जेएनयू’मधील घडलेल्या घटनेचा निषेध केला.