breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जीएसटीच्या बनावट पावत्यांमुळे नागरवस्ती विभागाची फसवणूक

  • शिलाई मशिन लाभार्थ्यांचा खोडसाळपणा
  • जीएसटीची खरी पावती सादर करण्याचे आवाहन

पिंपरी – महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शिवण मशीन घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना सहा हजारांचे अनुदान देण्यात येते. परंतू, अनुदानासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी जीएसटीच्या बनावट पावत्या सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष मशीन खरेदी करून जीएसटीची खरी पावती सादर करावी, असे आवाहन नागर वस्ती विकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुशंगाने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना शिवण मशीन खरेदीसाठी सहा हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे. लाभार्थी महिलांनी शिवण मशीन खरेदी करून बीलाची पावती सादर करणे बंधनकारक आहे. परंतू, बिलाच्या सादर केलेल्या पावत्यांमध्ये अनेक बनावट पावत्या असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

 

त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष मशिन खरेदी करुन जीएसटी बिलाची खरी पावती नागरवस्ती विभागास सादर करावी. तसेच, जीएसटी क्रमांक बरोबर असल्याची दुकानदाराकडून खात्री करुन घ्यावी. अन्यथा लाभार्थीं शिवण मशीनचे अर्थसहाय्य मिळण्यापासून वंचित राहील. त्याला सर्वस्वी लाभार्थींच जबाबदार राहणार असून पालिकेची जबाबदारी राहणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button