जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त ५१ हजार रुपयांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200617-WA0037.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यात आली.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या ३४६ व्या स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या आकुर्डी, पिंपरी-चिंचवड पुणे येथील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस मावळ विभागीय प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिजाऊ स्मृतीदिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे सचिव व मराठा सेवा संघाचे केरळ राज्य प्रभारी प्रकाश जाधव यांच्या हस्ते ‘कोविड’* संकटाचा मुकाबला करण्यासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मावळ प्रांताधिकारी मा.संदेश शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी ॲड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, सचिव वाल्मिक माने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नकुल भोईर, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर कार्याध्यक्षा सुनिताताई शिंदे, डॉ. प्रकाश चव्हाण, पतसंस्थेचे व्यवस्थापक पोपट शिर्के व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले. प्रमुख उपस्थितांचे स्वागत ॲड. लक्ष्मण रानवडे केले व आभार पोपट शिर्के यांनी मानले.