breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने किरण जठार यांचे नगरसेवक पद रद्द

पुणे – बोगस कागदपत्र सादर करून मिळविलेले जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांना पद गमवावे लागले आहे. आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि. 30) याबाबतचे आदेश दिले.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत किरण जठार यांनी भाजपच्या तिकीटावर कळस-धानोरी प्रभाग क्रमांक 1 मधील अ गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली. निवडणुकीत त्या विजयी झाल्या. उमेदवारी अर्ज भरताना किरण जठार यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयाकडून जातीचा दाखला घेतला होता.

त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत हुलगेश चलवादी, दिलीप ओरपे आणि रेणुका चलवादी यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन जठार यांनी जातीचा दाखला प्राप्त केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नगरसेवक रद्द गमवावे लागले आहे. त्यांच्यावर आयुक्त राव यांनी ही कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button