breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तळेगावात एकावर ‘एट्रॉसिटी’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 5 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लेबर कॅम्प आंबी, ता. मावळ याठिकाणी हा प्रकार घडला होता.

रामदास बबलू घोजगे (वय 32, रा. एमआयडीसी आंबी, ता मावळ, जि. पुणे) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राहूल मुकूंद साळवे (वय 32, रा. केदार हाईट्स, मक्सरनेस कॉलनी नं. 2, तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे यानी कर्ज काढळेल्या थकीत रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी घोजगे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याचा राग आल्याने घोजगे यांनी साळवे यांच्याबाबत जातीवाचक अपशब्द वापरले. पैसे द्यायला मी मोकळा नाही….., निघ इथून तुला काय करायचे ते कर…., तक्रार करायची असेल तर सहा महिने आत बसेन पण तुला पैसे देणार नाही. असे म्हणून साळवे यांना ढकलून दिले. शिवाय, त्यांच्या आईला फोन करून आश्लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे, अशी माहिती तक्रारीत नमूद केली आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button