जागतिक महिला दिन : स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने कचरावेचक महिलांना सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/4-8.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
जागतिक
महिला दिनानिमित्त स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने कचरावेचक महिलांचा
साडी तसेच हळदी-कुंकू लावून सन्मान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील कचरावेचक महिला आपले काम
प्रामाणिकपणे पार पाडत असतात, तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी अनेकदा स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता
इतरांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या कामातून पार पाडत असताना दिसून येतात. अशा 8
महिलांचा स्वायत्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. निता
तौर, निलम शिंदे, लता तौर,
गंधिरा लव्हे, लक्ष्मी भोसले, संगीता सरोदे, निर्मला लोखंडे, निला हवळे या महिलांचा संगीता पाचंगे आणि संस्थेच्या अध्यक्षा निर्मला
जगताप यांच्या हस्ते पिंपरी, लिंकरोड येथे पार पाडण्यात
आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता धाक्रस, अॅड. चारुशिला टाले, अॅड. निशा चव्हाण, गायत्री जगताप, निरजा देशपांडे, जयश्री विरकर, अंजली ब्रह्मे, किर्ती नायक, सुरेखा वाडेकर, किमया खांडवे, ज्योती पाखले आदी संस्थेच्या पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.