breaking-newsपिंपरी / चिंचवड

जागतिक महिला दिन ; निराधार मुलींना शालेय साहित्याचे वाटप

– डब्ल्यूटीई इन्फ्रा  प्रोजेक्ट  कंपनीचा उपक्रम
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – निराधार, पोरकी मुले-मुली आणि अडचणीत सापडलेल्या स्त्रिया यांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची, पोटभर अन्न, अंगभर कपडा अन् घराची ऊब द्यायची, पाठीवरून मायेचा हात फिरवायचा. त्यांना माणूस म्हणून वाढवायचे हे कार्य खचितच अवघड अन् आव्हानात्मक.  तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेम्बो हाऊस संस्थेने अनंत अडचणींना तोंड देत हे कार्य लीलया पेलले आहे. येथील मुलींना त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविण्याचे काम चाकणमधील डब्ल्यूटीई इन्फ्रा  प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या महिलावर्गांनी जागतिकमहिलादिनानिमित्त केले.
उराशी धरून बराच वेळ गप्पा मारतात. मग आपल्याला का कोणी सोबत नेत नाही, आपणांस का कोणी भेटायला येत नाही, अशा प्रश्नांमुळे अवघ्या दोन ते पंधरा वर्षांची  चिमुरडी हिरमुसतात. त्यामुळे काही ज्यांना कोणी भेटायला अथवा नेण्यासाठी आले आहे, त्यांच्याजवळ घुटमळतात. काही बालके आपणास कोणी भेटायला येईल, या वेडय़ा आशेने डोळे लावून बसतात.तळेगाव दाभाडे येथील अनाथ मुलींच्या आश्रमातील हे वास्तव. नऊ वर्षांपासून ही प्रेरणा रेम्बो हाऊस ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत 50 हून अधिक बालके आहे. निराधार मुलींना त्यांच्या अन्न, वस्त्र व निवा-याची सोय करणे तसेच पुनर्वसनाचे प्रयत्न अखंडपणे सुरु आहेत.
चाकणमधील डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट  लिमिटेड कंपनीच्या महिला वर्गांनी या अनाथ मुलींच्या आश्रमाला जागतिक महिलादिनानिमित्त भेट देऊन त्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप केले.  या संस्थेतील मुलींबरोबर कंपनीच्या महिला वर्गांनी मनमोकळेपणाने गप्पा मारुन त्यांच्या सोबत महिलादिन साजरा केला. निराधार मुलींच्या चेह-यावर आनंदाचे क्षण यावेत म्हणून  त्यांच्या सोबत डान्स केला. जागतिक महिलादिनानिमित्त एक दिवस त्यांच्या चेह-यावर हसू आणण्यासाठी कंपनीतील सर्व महिलांवर्गानी या समाजकार्यात हातभार लावला.  यावेळी डब्ल्यूटीई  इन्फ्रा  प्रोजेक्ट कंपनीतील अश्लेषा गाढवे, जयश्री शेवाळे, विद्या गुजरकर, शितल बांगडकर, शामली चव्हाण, स्वाती ढोले, मनीषा गायकवाड, लावण्या चक्रमथी, किर्ती नावकार, सपना अंबाडे, चेतना रहाटे या महिला उपक्रमात उपस्थित होत्या.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button