जागतिक महिला दिन : कर्तुत्ववान ‘सीए’ महिलांचा गौरव; पुस्तकरुपी जीवनप्रवास प्रकाशित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-11.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
चिंचवड
येथील प्रतिभा महाविद्यालय सभागृहात सोनद सेवा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने
चार्टर्ड अकौंटंटच्या होणार्या युवकांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने सीए व लेखिका
क्षितीजा कांकरिया-जैन हिने 35 सीए झालेल्या महिलांना
संपर्क करून त्यांना सीए करताना त्यांना किती अडचणी आल्या त्यांच्या शब्दात
आलेल्या शब्दरुपी संग्रहाचा एकत्रित पुस्तिकेचे प्रकाशन आज ‘8 मार्च जागतिक महिला दिन’ या दिनानिमित्त
संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चार्टर्ड अकौंटंटच्या माजी
अध्यक्षा श्रृती शहा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकौंटंट पुणे शाखेच्या
माजी अध्यक्षा रुता चितळे, संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, पुस्तकाच्या
लेखिका व सीए क्षितीजा कांकरिया-जैन, आलोक महरोत्रा,
सिमरण विलवाणी, पंकज सुराणा, संतोष संचेती यांच्या उपस्थितीत पुस्तिकेचे प्रकाशन करून फिलीफिन्स,
हाँगकाँग, नॉर्वे, दिल्ली, नोएडा, नाशिक,
मुंबई, बेंगलोर, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील 35 महिला चार्टर्ड अकौंटंट झालेल्यांचा गौरव स्मृतिचिन्ह, शाल व स्विंग हे प्रकाशित केलेले पुस्तक भेट देवून विविध मान्यवरांच्या
हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्या
मुला-मुलींना आदर्श नागरिक बनविणार्या ज्येष्ठ कर्तुत्ववान महिला पुरस्कार विविध
मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल देवून गौरविण्यात
आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र कांकरिया
यांनी करताना म्हणाले, संस्थेच्या
वतीने नेत्रदान अभियान, स्पर्धा मित्र मासिक, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, गुणवंत
विद्यार्थी शिष्यवृत्ती, आदर्श अंनिस कार्यकर्ता पुरस्कार
आदी उपक्रम राबविले जाते. सीए उत्तीर्ण होणे ही अवघड बाब आहे, अशी पालक-विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्येही याबाबत चर्चा घडते. यासाठीच
ज्यांनी सीए केलेला आहे, त्यांनी त्यांच्या प्रवास कसा
केला. हे त्यांच्या शब्दांत माहिती मागवून त्यांच्या कथा संग्रहाची एक पुस्तिका
प्रकाशन करण्याचे ठरवून आज त्याचे प्रकाशन केले. जेणेकरून भविष्यात सीए करणार्यांना
ही पुस्तिका मार्गदर्शन ठरेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची मुथा व हिरल मेहता यांनी केले.
आभार लेखिका व सीए क्षितीजा कांकरिया यांनी मानले.