Breaking-newsपिंपरी / चिंचवड
जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/IMG-20190310-WA0017.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळारच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन महापाैर राहूल जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक शिवकुमार बायस, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, संगिता सुवर्णा, सुरेश पवार उपस्थित होते.
या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन,नेत्र तपासणी, मधुमेह, रक्तदाब, ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टराकडून तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी 150 महिलांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त समाधान भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरसे यांनी केले. यावेळी सुरेश पवार यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती दिली. यावेळी सुरेखा मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधवी खुणे,संगीता क्षीरसागर, शैलजा आवडे यांनी परिश्रम घेतले.