breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतिक तंबाखू विरोध दिन, महापालिकेत तंबाखूमुक्तीची शपथ

– नगरसचिव कार्यालयात कर्मचा-यांनी दिली शपथ

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसचिव कार्यालयात कर्मचा-यांना सामुहिकपणे तंबाखु विरोधी शपथ देण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, नगरसचिव उल्हास जगताप यांच्या उपस्थित होते.  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त  जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील पत्रानुसार ग्लोबल अडल्ट टोबेका सर्वे २०१६-१७ च्या सर्वेक्षणानुसार धुम्रपान करणा-यांचे प्रमाणे हे इतर राज्याच्या तुलनेने धूरविरहित व तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तंबाखूमुक्ती विषयी जनजागृती होणे, आपला परिसर, शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे. सदर सर्व्हेनूसार महाराष्ट्र राज्यातील १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुलाचे तंबाखु वापरण्याचे प्रमाण सन २००९-१० च्या तुलनेत २.९% वरुन ५.५ % पर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था सुध्दा तंबाखुमुक्त होणे गरजेचे आहे.

राज्यात सदर व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव विभागातील सर्व कर्मचा-यांना स्थायी समिती सभापती विलास मेडिगेरी, नगरसचिव उल्हास जगताप यांच्या समवेत सामुहिकपणे तंबाखु विरोधी शपथ घेण्यात आली. तंबाखू विरोधी शपथ स्थायी समिती सभापती विलास मेडिगेरी  यांनी वाचन करुन सर्व कर्मचा-यांनी दिली. याप्रसंगी नगरसचिव कार्यालयातीस सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी त्या कर्मचा-यांना मेडिगेरी यांनी तंबाखू व्यसनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. तंबाखु व्यसनांपासून दूर राहण्यास सांगून तंबाखु मुक्तीची शपथ दिली.

दरम्यान, महापालिकेच्या सर्व विभागात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानूसार तंबाखू विरोध दिन साजरा केला. तंबाखूचे शरीरावर होणारे विपरित परिणाम, अधिकारी व कर्मचा-यांना तंबाखू विरोधी शपथ घेण्यास सुचित करणे, त्यानुसार वैद्यकीय विभागात तंबाखू विरोधी शपथ वाचन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ. वर्षा डांगे, दिलीप करंजखेले, नितीन ठोंबरे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button