Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
जलवाहिनीतून होणारी पाणी गळती थांबवा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/IMG-20180516-WA0019.jpg)
पिंपरी – भोसरीतील टेल्को रस्त्यावर थरमॅक्स कंपनीसमोर जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची नासाडी होत आहे.
टेल्को रस्त्यालगत मागील दोन महिन्यांपासून या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. लाखो लिटर पाणी रात्रंदिवस वाया जाते. थरमॅक्स कंपनीतील कर्मचारी दशरथ शितोळे यांनी याबाबत पालिका व एमआयडीसीकडे तक्रार केली. परंतु, दोन्ही अधिका-यांनी लक्ष दिले नाही. नंतर मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लाहीवाल व पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली.
पालिका व एमआयडीसीच्या अधिका-यांनी गळतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. परंतु, जवळत विद्यूत खांब असल्याने दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. त्याप्रमाणे विद्यूत विभागाला खांब काढण्याबाबत पत्र देण्यात आले. मात्र, तो खांब निघाल्याशिवाय गळती थांबू शकत नसल्याने मोठ्या प्रमाणे पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पालिका एमआयडीसीच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही नासाडी होत असल्याचे अण्णा जोगदंड, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, अॅड.सचिन काळे यांनी म्हटले आहे.