breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी मनसे लढा उभारणार – सचिन चिखले

  • मनसेविषयीच्या गैरसमजाला जनतेने बळी पडू नये
  • पिंपरी-चिंचवड मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांचे आवाहन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी          

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला भगव्या झेंड्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच अनावरण केले. त्यावरून वादाची ठिणगी उडालेली असताना पिंपरीतील मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी या टिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदू आणि विशेषतः मराठीचा मुद्या घेऊन महाराष्ट्रात पुन्हा शिवराज्य आणण्यासाठी मनसे संघर्ष उभा करणार आहे. महाराजांची राजमुद्रा पक्षाने भगव्या झेंड्यावर घेतली आहे. परंतु, या झेंड्याचा निवडणूक प्रचारासाठी कसलाही वापर केला जाणार नाही. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी समाजात गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होत आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. मनसेची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत झालेली आहे. या झेंड्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जाणार नाही, अशा सूचना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्याचे पालन करणे प्रत्येक मनसैनिकाला बंधनकारक आहे, असा खुलासा सचिन चिखले यांनी केला आहे.

मनसेने त्यांच्या पक्षीय भगव्या झेंडयावर राजमुद्रा उमटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला आहे. हा शिवद्रोह आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी जातीचे रंग बाजूला ठेऊन १४ वर्षात राजकीय जहाज बुडाल्यानंतर राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या राजमुद्रेचा आधार घ्यावा लागला, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी मनसेवर टिका केली होती.

या टिकेला प्रत्युत्तर देताना चिखले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. त्यांनी लोकांचे कल्याण साधणारे स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य चालवण्यासाठी त्यांनी राजमुद्रेची निर्मिती केली. राजमुद्रा ही प्रशासकीय बाब आहे. महाराजांच्या काळात जोपर्यंत राजमुद्रा पत्रावर उमटत नव्हती, किंवा राजमुद्रेचा शिक्का मारला जात नव्हता, तोपर्यंत तो व्यवहार अधिकृत मानला जात नव्हता. याची जाण प्रत्येक मनसैनिक ठेवणार आहे. त्यामुळे राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अवमान मनसैनिक कदापी करणार नाही, यावर सांगोपांग विचारविनिमय झाला आहे. आमची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना टिवकण्याची आहे, असे चिखले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

महाराजांच्या छत्रछायेखाली विविध जातीधर्मातील जनता ज्या सुखासमाधानाने नांदत होती. तसे लोकांचे, रयतेचे सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करणार आहोत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेबाबत समाजात जो गैरसमज पसरवला जात आहे. त्याला नागरिकांनी बळी पडू नये.

नगरसेवक सचिन चिखले, मनसे शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button