चुलत भावानेच केला बहिणीचा गळा आवळून खून
![Five arrested in Sangli murder case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/murder_1561274504.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – सासू आणि मुलीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईला ढकलून दिल्याच्या रागातून चुलत बहिनीचा भावाने गळा आवळून खून केला. ही घटना चिंचवडच्या दळवीनगरमध्ये घडली. खूनानंतर आरोपी संतोष भोंडवे स्वतः पोलिसांत दाखल झाला.
ऋतुजा भोंडवे असे मृत मुलीचे नाव आहे. छाया विलास भोंडवे (वय 40, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजाने दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपासून ऋतुजाचा सासरी वाद सुरू असल्यामुळे माहेरी आली होती. दरम्यान, ऋतुजा आणि सासू यांच्यात वाद सुरू झाला. भांडणे सोडविण्यासाठी ऋतुजाची आई छाया भोंडवे पुढे गेल्या. तिने आईला ढकलून दिले. त्याचा राग आल्याने चुलत भाऊ संतोषने रागाच्या भरात ऋतुजाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केला आहे. चिंचवड पोलीस सपास करत आहेत.