breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त पाळणाघरातील बालकांच्या चेह-यावर आनंद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

समाजातील उपेक्षित घटकासाठी मदतीचा हात भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष गणेश बबन जवळकर यांची कन्या राजनंदिनी गणेश जवळकर हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून घरकाम करणाऱ्या महिलांच्या लहान मुलांच्या पाळनाघराला जीवनाशक्य वस्तू देण्यात आल्या.

प्रसंगी बबन जवळकर, नगरसेवक संजय कणसे, अजय जाधव, विकास विधाते, संजय टोणगे, शुभम जवळकर, इरफान भाई व संस्थेचा कर्मचारी वृंद उपस्तिथ होते.

सामाजिक जीवन जगत असताना उपेक्षितांच्या हितासाठी माणसाने थोडेसे जगले पाहिजे. आपल्या बहुमुल्य सरकार्याने उपेक्षितांचे हित जोपासले जाऊ शकते. त्यामुळे सर्वांनीच कर्तव्य म्हणून अशा पाळणाघरांना बहुमुल्य मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे, असे मत गणेश जवळकर यांनी यावेळी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button