breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिखली, जाधववाडी येथील अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेडवर कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक 2 मधील मौजे चिखली जाधववाडी याठिकाणच्या अनधिकृत पत्राशेडवर महापालिकेने कारवाई केली. तब्बल नऊ बांधकामे आणि पत्राशेड उध्वस्त करण्यात आली.

चिखली जाधववाडी प्रभागातील चिखली बालघरे वस्ती सेक्टर 16 जवळील गट नं. 754/755/756 येथील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड अशा एकूण 9 हजार 979 चौरस फुटाच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागातील दोन उपभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, 9 बीट निरीक्षक यांनी केली. त्यासाठी एक पोलीस निरीक्षक, 21 पोलीस कर्मचारी, 2 जेसीबी आणि 10 मजूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. हे झाले पत्राशेडचे आत कमर्शियल बांधकामांवर कारवाई कधी होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button