Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिखलीत एटीएम फोडून अकरा लाख रुपये लंपास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/5555.jpeg)
पिंपरी |महाईन्यूज|
एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरट्याने सुमारे अकरा लाखांची रोकड लंपास केली. ही घटना चिखलीतील नेवाळेवस्ती येथील एटीएम सेंटरमध्ये घडली.
नेवाळेवस्ती येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएममध्ये शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी रोख रक्कम जमा करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी (11) दुपारी तीनच्या सुमारास एटीएममधून रक्कम चोरीला गेल्याचे बँक प्रतिनिधीच्या निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह नागरिकांकडेही चौकशी सुरु केली आहे. गॅस कटरने मशीन कापून रक्कम चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.