breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभेची धुरा आता योगेश चिंचवडे आणि विनोद तापकीर यांच्या खांद्यावर

  • चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे यांची निवड
  • सांगवी-किवळे मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची निवड

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १५) बैठक घेण्यात आली. त्यामध्ये चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे आणि सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची बिनविरोध निवड झाली.

माजी जलसंधारणंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली थेरगावमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, उमा खापरे, नगरसेविका झामाबाई बारणे, राजेश पिल्ले, प्रमोद निसळ, काळूराम बारणे, प्रमोद ताम्हणकर, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील सहापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चिंचवड-किंवळे आणि सांगवी-काळेवाडी या दोन मंडलांच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या. नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीत चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे आणि सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी योगेश चिंचवडे व विनोद तापकीर यांचे अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button