breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड- वाल्हेकरवाडी येथे साकारतोय आता अध्ययावत मल्टीस्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

  • आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार उद्घाटन
  • आहेर उद्योग समूहाचे क्रीडा क्षेत्रात दमदार पदार्पण

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवडमधील क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी. नवोदित खेळाडूंना आधुनिक सोई-सुविधांनी सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे. या हेतूने आहेर उद्योग समूहाच्या वतीने चिंचवड- वाल्हेकरवाडी येथे अत्याधुनिक मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे.

आहेर उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश आहेर म्हणाले की, पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या आता सुमारे २८ लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे स्थानिक मुलांना आधुनिक दर्जाच्या क्रीडा सोई- सुविधा उपलब्ध होत नाहीत. आहेर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा आमचा मानस आहे.


आहेर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे दोन एकर जागेवर वसवण्यात आलं आहे. या भव्य कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, टेनिस, कबड्डी, योगा, कराटे, तायक्वोंडो, बास्केटबॉल आणि क्रॉसफिट फंक्शनल स्टुडिओ यासारखे विविध स्पोर्ट्स आणि या सर्व खेळांचे कुशल प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे.

काय आहेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची वैशिष्ट्ये:

प्रोफेशनल कोचिंग, 360 डिग्री प्लेयर डेव्हलपमेंट, कॉर्पोरेट ग्राउंड बुकिंग आणि स्पोर्ट्स इव्हेंट, ग्रासरूट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, इंटरनॅशनल अँड नॅशनल एक्सप्लोजर, पर्सनल कोचिंग बॅचेस, अंडर लाईट प्रॅक्टिस सेशन, इंटरनॅशनल कोचेस व्हिजिट, फन फिटनेस गेम्स, सर्टिफाईड कोचेस, स्पोर्ट्स शॉप्स, स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि फिटनेस बॅच अशी वैशिष्ट्ये आहेर स्पोर्ट्स कॉम्प्लेसची आहेत, अशी माहिती व्यवस्थापक सिद्धेश येणपुरे यांनी दिली.

जागतिक महिला दिनी होणार लोकार्पण

आहेर स्पोर्ट्स क्रीडा संकुलाचे लोकार्पण सोहळा उद्या दि. ०८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. आमदार लक्षण पांडुरंग जगताप यांच्याहस्ते क्रीडा संकुलाचे लोकार्पण होईल. प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका क्रीडा विभागाचे सहाय्यक संजय नवले आदी उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button