चिंचवड येथील महिलेवर जबरदस्ती बलात्कार, तरुण फरार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी 38 वर्षाच्या महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधीत व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) निदर्शनास आला आहे.
विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शननगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ याने 21 नोव्हेंबर 2018 ते 9 जानेवारी 2019 दरम्यान एका 38 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केला. त्यांच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित केल्यानंतर एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर दोघांमध्ये झालेल्या अनैतिक संबंधाबाबत नव-याला सांगेन, व्हीडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.