breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड, च-होलीत स्मशानभूमी करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

आयुक्त श्रावण हर्डिकरांना दिला आंदोलनाचा इशारा
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  चिंचवडगाव, च-होलीगाव, वडमुखवाडीत स्मशानभूमी नवीन बांधून मिळावी, निगडीत विद्युत दाहिनी नव्याने बसविण्यात यावी, जुनी सांगवीतील अर्धवट कामे पुर्ण करण्यात यावी, या मागण्यासाठी शहर मनसे पदाधिका-यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची भेट घेवून मागण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी मनसे गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले, सरचिटणीस राजू सावळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बालाशेठ दानवले, मयुर चिंचवडे, अमित तापकीर आदी उपस्थित होते.  याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी आयुक्तांनी लवकरच सर्व माहिती घेवून त्या जागाची पाहणी करुन लवकरच निर्णय घेवू असे आश्वासन दिले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button